MPSC Gazetted Technical Combined Preliminary Examination 2021 – Regarding Seating Arrangement on Nanded Center

विषय : – महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ – उमेदवारांच्या बैठकव्यवस्थेबाबत .

संदर्भ : – आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक ३१ मार्च , २०२२ रोजीचे प्रसिध्दीपत्रक .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार , दिनांक ३० एप्रिल , २०२२ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा , संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ करीता जाहिरातीस अनुसरुन आयोगास अर्ज सादर करताना उमेदवारांनी त्यांच्या पसंतीचे जिल्हा केंद्र निवडले असले तरी , औरंगाबाद येथे अन्य संस्थेच्या परीक्षेसाठी उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आल्यामुळे प्रशासकीय अडचण निर्माण होत असल्याची बाब जिल्हाधिकारी , औरंगाबाद यांनी त्यांच्या दिनांक ८ एप्रिल , २०२२ रोजीच्या पत्राद्वारे आयोगाच्या निदर्शनास आणली आहे . सदर बाब विचारात घेता , प्रस्तुत परीक्षेचे आयोजन सुरळितपणे होण्यासाठी प्रशासकीय कारणास्तव औरंगाबाद जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकी नांदेड व हिंगोली जिल्हा / शहरांमधील कायमस्वरुपी रहिवासाचा पत्ता नमूद असलेल्या उमेदवारांना ‘ नांदेड ‘ या नवीन जिल्हा केंद्रावर प्रवेश देण्यात येत आहे . २. वरील व्यवस्थेप्रमाणे प्रवेश देण्यात आलेले जिल्हा केंद्र बदलण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव , कोणत्याही • सबबीखाली मान्य करता येणार नाही .

ठिकाण : मुंबई

सहसचिव , परीक्षा पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Download: Technical Combined 2021- Regarding Seating Arrangement on Nanded Center

Leave a Comment