GCC-TBC Typing Exam Notification 2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांनी सन २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा(GCC),शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि GCC-SSD-CTC च्या परीक्षासाठीच्या अधिसूचना जाहीर केलेल्या आहेत.

प्रकाशित अधिसूचनेनुसार अंदाजित परीक्षा या एप्रिल २०२४ या महिन्यात होऊ शकतात.
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :


**सर्व संस्था चालक,*

*आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मशीन टायपिंग, ऑनलाइन लघुलेखन आणि संगणक टंकलेखन परीक्षेच्या फॉर्मच्या नोंदणीस सुरुवात होत आहे. सर्वांनी अधिसूचनेचे बारकाईने वाचन करावे.*
*यावेळी नोंदणीसाठी संस्थाचालकांच्या फायद्याचे काही बदल केलेले आहेत. त्यामध्ये एकाच विद्यार्थ्याला जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त विषयांच्या परीक्षा द्यायच्या असतील,तर एकाच वेळी नोंदणी करून त्यापुढे जेवढे विषयांची परीक्षा द्यावयाची असेल, त्या विषयांसमोर ✔️ केल्यानंतर एकाच वेळी नोंदणी होऊ शकेल. यावेळी परीक्षा 1 ते 15 एप्रिलच्या दरम्यान होणार. डिसेंबर 2023 च्या परीक्षांचा निकाल 31 जानेवारी पूर्वी जाहीर करण्याचा परीक्षा परिषदेचा प्रयत्न आहे.म्हणजेच त्या पुढील 10-15 दिवसांमध्ये रिपीटर विद्यार्थ्यांना देखील लगेचच परीक्षेसाठी नोंदणी करता येऊ शकेल. यावेळी परीक्षार्थीच्या जातीचा प्रवर्ग(शाळेच्या दाखल्यावरील नमूद जात प्रवर्ग) नमूद करणे बंधनकारक आहे, जेणेकरून निकटच्या भविष्यात सारथी, बार्टी, आदिवासी विभाग,EWS,विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ यांचेकडून अर्थसहाय्य प्राप्त झाले, तर त्याचा लाभ आम्हाला विद्यार्थ्यांना (संपूर्ण शुल्क परतावा च्या स्वरूपात) देता येऊ शकेल. तसा प्रयत्न परीक्षा परिषदेमार्फत सुरू आहे. फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचे नाव अचूकपणे त्या-त्या रकान्यात टाकावे.*
धन्यवाद….*

*डॉ.नंदकुमार बेडसे,*
*अध्यक्ष,*
*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.*

१. GCC Manual Typing & ShortHand अधिसूचना ✅

अर्ज दिनांक : ११ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४.
( ११ फेब्रुवारी नंतर जास्तीचे विलंब शुल्क लागेल)
Note :
अर्ज करणे आणि अधिक माहितीसाठी जवळच्या शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्थेला भेट द्या.

संस्था यादी Link : https://www.mscepune.in/gcc/CT_INST_MUMBAI.aspx
MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी या परीक्षेचे प्रमाणपत्र चालते, पण ही परीक्षा
पास होऊनही तुम्हाला Computer वर Test आणि काम करावे लागणार आहे. तर, ही परीक्षा देणे टाळा ✅ GCC-TBC परीक्षा द्या.
या मधेच लघुलेखन आहे. जर तुमच्या सर्व Typing परीक्षा झाल्या असतील तर पुढे तुम्ही लघुलेखनची परीक्षा देऊ शकता. English मध्ये त्यांना Stenographer म्हणतात. सोबत Steno typist पण असतात. तर, या सर्वांसाठी Typing तर लागतेच सोबत Stenographyचे Certificate पण लागते. त्यासाठीही ही परीक्षा आहे.

Notification : GCC Typing Exam Notification April 2024

२. GCC-TBC Typing अधिसूचना ✅

अर्ज दिनांक : ११ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४.
( ११ फेब्रुवारी नंतर जास्तीचे विलंब शुल्क लागेल)
Note :

अर्ज करणे आणि अधिक माहितीसाठी जवळच्या शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्थेला भेट द्या.

संस्था यादी Link : https://www.mscepune.in/gcc/CT_INST_MUMBAI.aspx

MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी या परीक्षेचे प्रमाणपत्र लागते. त्यातही Marathi 30wpm आणि English 40wpm ही दोन प्रमाणपत्रे महत्वाची आहेत.

Notification: GCC-TBC Typing Exam Notification April 2024

३. GCC-SSD-CTC Exam अधिसूचना ✅

अर्ज दिनांक : ११ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४.
( ११ फेब्रुवारी नंतर जास्तीचे विलंब शुल्क लागेल)
Note :

अर्ज करणे आणि अधिक माहितीसाठी जवळच्या शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्थेला भेट द्या.

संस्था यादी Link : https://www.mscepune.in/gcc/CT_INST_MUMBAI.aspx

Notification: GCC-SSD-CTC Exam Notification APRIL 2024

Leave a Comment