How to Apply for MPSC Exam Online

How to Apply for MPSC Exam Online

आवश्यक बाबी…

१. तुमची प्रोफाईल पूर्ण पाहिजे. (mpsconline.gov.in)

२. पूर्ण करून अद्यावत आणि लॉक केलेली पाहिजे..

३. Login करून..Online Application मेनू मध्ये जा… लिस्ट मध्ये जी परीक्षा द्यायची आहे ती निवडा.

आणि खालील प्रक्रिया पूर्ण करा….

(अर्ज मागासवर्गीय (EWS) उमेदवाराचा केला आहे त्यामुळे सर्वसाधारण उमेदवाराला जास्त शुल्क असेल..उमेदवाराची महत्वाची माहिती लपवली आहे, तरी कुठे दिसत असल्यास कळवा. )

मला Instagram वर काही शंका असल्यास विचरू शकता…इथे खाली विचारले तर उत्तम..

MPSC Online Application Process
  1. Check Eligibility / पात्रता पडताळा.
  2. पात्र असल्यास ज्या परीक्षा/पदाला(समजा ASO STI PSI ची परीक्षा असेल तर तिथे तीन दिसतील.) टिक करा.
  3. Apply या बटनावर क्लिक करा.
MPSC Online Application Process

Apply बटनावर क्लिक केल्यावर हे दिसेल..

4. Drop Down लिस्ट मधून तुम्हाला ज्या जिल्ह्यात परीक्षा द्यायची आहे तो जिल्हा निवडा.

5. इथे तुमच्या नावासमोर Check Box वर टिक करायचे.

6. ज्या ठिकाणाहून अर्ज करत आहात ते ठिकाण लिहा.

7.Submit & Pay Fees वर पैसे भरण्यासाठी क्लिक करा.

MPSC Online Application Process

Submit & Pay Fees वर क्लिक केल्यावर कसे पैसे भरणार याचे विकल्प येतात.

8.इथे तुम्ही चलन किंवा Online पद्धत निवडू शकता.

इथे आपण Online Payment चे निवडणार आहोत.

MPSC Online Application Process

9. Online payment निवडल्यावर खाली अजून दोन विकल्प येतात त्यातूनही तुम्ही कोणताही एक निवडू शकता. आपण ccavenue निवडला आहे. हे Payments gateways आहेत त्यात कोणतेही निवडले तर हरकत नाही…

10. आपण ccavenue निवडला.

11. Ok वर क्लिक केले.

Ok वर क्लिक केले की, तुम्ही त्या payment gateways मध्ये जेवढे पर्याय असतील त्यातून भरू शकता. आपण निवडले होते त्यात netbanking, debit/credit cards , upi, walletes इत्यादी सर्वमान्य विकल्प आहेत…

त्यातून तुम्ही यशस्वी पैसे भराल अशी अपेक्षा.

MPSC Online Application Process

यशस्वी पैसे भरल्यावर Page Redirect होते.

अश्या प्रकारे तुमचा यशस्वी अर्ज करून झाला आहे….

आता अर्ज माहिती बघण्यासाठी…

12. Continue वर क्लिक करा.

MPSC Online Application Process

Continue वर क्लिक केल्यावर हे पान दिसेल.

यावर…

13. Fees Paid असे दिसेल…याचा अर्थ तुमचा अर्ज विना गडबडी पूर्ण झाला आहे….आता निवांत अभ्यास करा.

तरीपण….पुढे तुम्ही..

14. तुम्ही पैसे भरल्याची पावती घेऊ शकता.

15. अर्ज केलेल्या अर्जाची प्रत PDF मध्ये सेव किंवा Print करून ठेवू शकता.

मी असेच चेक करून बघितले की, परत अर्ज होतो का ?… तर वर लाल मध्ये बघा काय आले.

अडचणी तर खूप येत आहेत….जसे Profile Update करायला..अर्ज करायला…Profile करायला…Documents वैगरे वैगरे…..

एक टीप : मला एकाने सांगितले की तुमचे वय Open साठी ३८ पात्र आहे…तर तुमचे वय ३८ होऊन गेले आहे पण ३९ झाले नाही तरीही तुम्ही अर्ज करू शकता.

Leave a Comment