Only Prelim Strategy – MPSC Exam

Only Prelim Strategy. ✅


तर, खूप जण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना पहिल्यांदा मुख्य नंतर पूर्व अश्या पद्धतीने अभ्यास करतात आणि हेच सहसा सर्व यशस्वी उमेदवारांकडून किंवा इतरांकडून सांगितले जाते.
तसेच, फक्त पूर्वचा अभ्यास करा आणि पहिले पूर्व पास व्हा मग मुख्यचा बघा किंवा आधी पूर्व तर पास व्हा आपोआप मुख्य कराल असाही वर्ग आहे. तर, मी इकडून तिकडून ऐकले आहे तेच सांगतो. बाकी, घायचे की नाही ते तुमची मर्जी.✅


तर, समजा तुमच्याकडे ४-३-५ महिने असा कमी वेळ असेल तर, फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करा. अभ्यास एवढा करा की पूर्व परीक्षा Cut Offs च्या वर ३०-५० असतील अश्या गुणांनी पूर्व परीक्षा निघाली पाहिजे. ( उदा. या २०२१ वर्षीचे नाही सांगत तर, मागच्या वर्षी २०२० साठी १९०-२००-२०५ असे काहीतरी कट ऑफ येईल असे अंदाज बांधले जात होते तर या अंदाजांपेक्षा कमीत कमी तुम्हाला ३०-४० जास्त म्हणजे २३०-२४० गुण पूर्व परीक्षेत First Key ने यायला पाहिजे. तर ही आहे Only Prelim Strategy ✅.

ONLY PRELIM STRATEGY


याने होते काय?


तर, तुम्ही परीक्षा होऊन First Key बघुन त्या दिवसापासून फक्त आणि फक्त मुख्य चा अभ्यास करणार आणि तो करावाच लागणार कारण पूर्व पासच होणार आहे. अश्या पद्धतीने पुढील २-३ महिने निकालाची वाट न बघता ३ महिन्यात संपूर्ण मुख्यचा अभ्यास(कोणतीही मुख्य राज्यसेवा, ASO-STI-PSI, ESI-TAX-CT-TA-II, FOREST, AGRI, ENGG etc) करता येतो/करायला लागतो. आणि पुढे एकदा पूर्व परीक्षा पास झाली की त्या पूर्व ची भीती नाहीशी होते, असेही म्हणतात. तर, ही मी Only Prelim Strategy ✅ सांगितली आहे. या वेळेच्या नुसार तुम्ही राज्यसेवा २२ साठी तयारी करू शकता.

Homepage: mpscmaterial.com

Leave a Comment