MPSC च्या परीक्षेत क्रमाने करायच्या गोष्टी.
वर्गात जाल…OMR मिळेल.
त्यात
१. परीक्षेचे नाव
२. बैठक क्रमांक ( 0 कुठे आहे ते बघून गोळे भरा)
३. पेपर कोड ( हॉल तिकीट वर असतो)
४. स्वतःची सही करणे
एवढे भरून ठेवून दयाचे.
नंतर, तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल.
५. त्याचा सेट(ABCD) बरोबर लिहणे आणि गोळा भरणे. २ ठिकाणी आहेत. दोन्ही केले तरी चालते पण खालचा पर्यवेक्षक करतात का बघा नाहीतर सही करून गेल्यावर भरा.
६. प्रश्नपत्रिका पुस्तिका क्रमांक.
हे प्रश्नपत्रिका मिळाल्यावर करायचे.
नंतर मग हजेरीसाठी सही साठी एक शीट येईल त्यात प्रश्नपत्रिका पुस्तिका क्रमांक आणि उत्तर
पत्रिका क्रमांक लिहून सही करावी लागते.( मला आता नक्की माहिती नाही 😅 )
७. उत्तरपत्रिका क्रमांक लिहणे ( सोबत प्रश्नपत्रिका पुस्तिका क्रमांक लिहणे) आणि सही करणे.
हे झाले, पेपर झाला….
शेवटी २ मिनिटे मिळत असतील. त्यात किती प्रश्न सोडवले ते मोजायचे
८. किती प्रश्न सोडवले ते नमूद करायचे.
उत्तरपत्रिका भाग २ फाडून घ्यायचा आणि भाग १ जमा करायचा.
नवीन उमेदवारांना पाठवा. काही चूक असेल तर कळवा.
@mpscmaterial