सोपान प्रभाकर टोंपे
मुलाखत- औरंगाबाद, दिनांक: 23/04/2018
पॅनेल- ओक सर
वेळ : 30 मिनिट
मिळालेले पद- उपजिल्हाधिकारी.
दिलेली परीक्षा : MPSC राज्यसेवा परीक्षा २०१७
मी-
May I come in sir.
ओक सर –
Yes come in.
मी-
Good Afternoon sir.
पॅनेल-
Good Afternoon, बसा.
मी-
Thank you sir.
ओक सर-
(पूर्ण Biodata check केला.)
तुमचं B.A, D.E.D झालंय का ?
मी-
हो सर.
ओक सर-
B.A मुक्त मधून का केलं ?
मी-
सर, D.E.D करीत होतो. सोबत पदवी पूर्ण होण्यासाठी मी मुक्त मधून B.A करण्याचा निर्णय घेतला.
ओक सर –
शिक्षक का झाला नाहीस ?
मी-
सर, माझे D.E.D 2011 साली पूर्ण झालं. परंतु 2010 साली शेवटची CET झाली. त्यानंतर CET झाली नाही.
ओक सर-
तलाठी किती दिवस ?
मी-
सर, दोन-अडीच वर्षे तलाठी म्हणून कार्यरत होतो.
ओक सर –
निवड प्रक्रिया कशी आहे.?
मी-
सर, जिल्हा निवड समिती मार्फत केली जाते.
ओक सर –
मंत्रालयात किती दिवस व कुठे ?
मी-
सर मंत्रालयात १ वर्ष, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात कार्यरत होतो.
ओक सर-
STI म्हणून कुठे आहात ?
मी –
सर, राज्यकर सहआयुक्त कार्यालय, रायगड विभाग बेलापूर या ठिकाणी कार्यरत आहे.
ओक सर-
Ok. रायगड Division ला आहात का ? सध्या डिपारमेंटचे नाव काय आहे.
मी-
सर, सध्या Dept. चे नाव Goods and Service Tax Department असे आहे.
ओक सर-
काय आहे हो GST ?
मी –
सर, GST ही एक अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे. पूर्वी विविध प्रकारचे 17 Taxes होते. आता त्याऐवजी एकच Tax आहे. तो म्हणजे GST.
(17 Indirect Taxes होते असं म्हणायला पाहिजे होतं.) पण Cross Question झाला नाही.
ओक सर-
तिन्ही डिपार्टमेंट मध्ये काय फरक वाटला ?
मी-
सर, तलाठी पदावर काम करतांना Public Contact जास्त आहे. तुलनेत ASO-STI पदावर तो कमी वाटला. त्यानंतर तलाठी पदावरील काम हे प्रत्यक्ष Field वरील आहे. ASO-STI पदावर Official काम जास्त असतात.
ओक सर-
पसंतीक्रम सांगा.
मी-
सर, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,CO……
ओक सर –
उपजिल्हाधिकाऱ्याची कामे सांगा.
मी –
सर, SDM म्हणून कार्यक्षेत्रामध्ये कायदा-सुव्यवस्था राखणे, ज. म. विषयक विविध कामे पार पाडणे. आपत्ती व्यवस्थापन, निवडणूका ही कामे आहेत. शिवाय तहसील कार्यालयामधील व जिल्हाधिकारी कार्यालयामधील दुवा म्हणून काम करणे. इतर पदावर DSO म्हणून पुरवठा विषयक बाबी, SLAO म्हणून जिल्ह्यातील भूसंपादन विषयक काम करावी लागतात.
ओक सर –
भूसंपादन कसं केलं जातं ?
मी –
सर, सध्या सुधारित भूसंपादन अधिनियम 2013 आहे. त्यानुसार केलं जातं.
मेंबर 1 (IAS) –
नक्षलवाद काय आहे?
मी-
सर, ही एक डाव्या विचारसरणीची चळवळ आहे. हिंसकमार्गाचा अवलंब करून सध्याचे लोकशाही सरकार उलथून टाकणे हा त्यांचा उद्देश आहे.
मेंबर 1-
Newspaper मध्ये काही आहे का ?
मी –
हो सर, आजच्या पेपर मध्ये News आहे की, आपल्या सुरक्षा दलाने नक्षलवादी ठार केले आहेत.
सदस्य-
यु. म. पठाण यांच्याबद्दल माहिती आहे का ?
मी-
हो सर, श्री. यु. म. पठाण सर, हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचं ‘संतसाहित्याचे नवचिंतन’ हे पुस्तक सुद्धा मी वाचलंय.
सदस्य-
Okk..
सदस्य 2 (IAS)-
तलाठी म्हणून कुठे होता ?
मी-
सर, हिंगोली तहसील कार्यालय अंतर्गत तलाठी सज्जा बोराळा येथे कार्यरत होतो.
सदस्य-
7/12 मध्ये किती गाव नमुने असतात ?
मी-
सर, 7,12, 7 अ. असे तीन नमुने असतात.
सदस्य-
पीक पाहणी कशी करतात ?
मी-
सर, प्रत्यक्ष शेतावर जाऊन करतात सर,
सदस्य –
तुम्ही गेला होतात का शेतावर ?
मी-
हो सर, प्रत्यक्ष शेतावर जाऊनच नोंदी केल्या होत्या.
सदस्य-
तलाठी शेतावर जातच नाहीत. सज्जावर बसूनच नोंदी करतात. बरोबर न
मी-
नाही सर, शक्य होईल तेवढे शेतावर जाऊनच नोंदी केल्या जातात. त्यामुळे पुढील कामे सोपी होतात. Ex. दुष्काळ अनुदान वाटप, रोहयो, सै.उपकर याद्या.
सदस्य-
तुम्ही खोटे बोलताय ; शेतावर जाऊन मोजणी करता का ?
मी-
नाही सर, अंदाजे केली जाते.
सदस्य-
NA बद्दल सांगा.
मी-
सर, ज्यावेळी कृषी जमिनीचे अकृषी वापरासाठी रूपांतर होते. तेव्हा NA Process केली जाते. (त्यांना Details अपेक्षित होतं वाटतं.)
सदस्य-
तुमचा ‘छंद’ संतसाहित्य वाचन आहे ?
मी-
हो सर.
सदस्य-
कोणत्या संताबद्दल वाचन केलं ?
मी-
सर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत कबीर इत्यादी. संतांबद्दल वाचन केले सर.
सदस्य-
ज्ञानेश्वरी काय आहे ?
मी-
सर, ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर केलेली टीका आहे.
सदस्य-
ज्ञानेश्वरीचा संदेश काय आहे ? एका वाक्यात सांगा.
मी-
सर, “जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा” हा संदेश दिलाय सर.
सदस्य-
भगवतगीता संदेश काय? एका ओळीत सांगा. ( त्यांना केर्मव्यवाधिकारस्ते… अपेक्षित असावं)
मी-
Philosophical उत्तर दिलं. सर,अन्यायाविरुद्ध आपण लढलं पाहिजे ( मला कौरव-पांडव आठवले) आणि कार्यचरण हीच खरी ईश्वर भक्ती आहे. असा संदेश भगतगीतेतून दिला आहे.
ओक सर-
तुमची निवड का करावी? Strong Point, Weak Point सांगा.
मी-
सर, Strong point
1) 100% Dedication देऊ शकतो.
2) अपयश आले तरी खचून न जाता त्यावर Overcome करू शकतो.
Weak point-
1) सर, माझी Height कमी आहे. (ओक सर म्हटले, तुम्ही DySp Preference दिला नाही. तो झाला. दुसऱ्या सांगा.)
2) सर, Spoken English मध्ये थोडा Weak आहे. पण त्याच्यावर सध्या काम करतोय सर.
ओक सर-
Okk, Thank You तुम्ही येऊ शकता.
मी-
Thank You SIr, Have a nice day Sir..
Additional information
Date of Birth : 05/02/1991
MPSC interview marks : 51
Preferences : 1-DYCA 2-TAHA 3-COMA 4-DCEA 5-ASCA 6-NTHB 7-COMB 8-DEOB 9-BDOB 10-ARSB 11-DSLB 12-SEOB 13-SDOB (हे पदांचे Short Codes आहेत. So, Don’t Worry)
MPSC Rajyaseva Exam 2017
Deputy Collector, Group – A
Name | TOMPE SOPAN PRABHAKAR |
Rank | OPEN – General – 3 |
Language Descriptive Paper | 34+20 Marks |
Language Objective Paper | 77 Marks |
General Studies Paper 1 | 81 Marks |
General Studies Paper 2 | 105 Marks |
General Studies Paper 3 | 108 Marks |
General Studies Paper 4 | 95 Marks |
Interview Marks | 51 Marks |
Total Marks/900 | 520 +51 = 571 Marks |
Notice : if anything is wrong/violated in this post from us then feel free to contact, we will take Acton from us. Thank you !