Candidate : संकेत देवळेकर.
मिळालेले पद : Deputy superintendent of police (DySP)
दिलेली परीक्षा : MPSC राज्यसेवा परीक्षा २०१८
पॅनल मेंबर्स
अध्यक्ष : मा. मेश्राम सर
M1 : मा. अश्विनी भिडे मॅम
M2 : Respected Officer.
अध्यक्ष :
-२०१२ वी नंतर तुम्ही विशेष काही केले नाही वाटतं ?
-UPSC केली बरं ! State Excise DySP आहात ?
-UPSC चा Status काय ?
M2 :
-UPSC चा Optional कोणता तुमचा ?
अध्यक्ष :
-मग आता DySP Preference आहे ?
-पण पोलिसांबद्दल तर नकारात्मकतेची भावना आहे ?
-अशी कोणती कामे तुम्ही अनुभवलीत ज्यात पोलिसांबद्दल इतका विश्वास आहे ?
-असे कोणते प्रश्न तुम्ही पाहिलेत त्यामुळे DySP व्हावे वाटते ?
-पण Custodial Death प्रकरण माहित आहे का ?
M1+अध्यक्ष:
-मग, असे प्रकार योग्य आहेत का ?
-आजकाल जातीय तेढ वाढतेय, आरक्षणासंबंधी आंदोलन हिंसाचार केला जातोय योग्य आहे का हे ?
मग हे प्रकार कसे कमी करायचे ?
(Grdauation वर ) :
-China ने Google Moon असं काहीतरी तयार केलंय, याबद्दल काही वाचलय का ?
-Carrom कुठल्या लेव्हल पर्यंत खेळला ?
-Artificial Intelligence चा Carrom मध्ये काय उपयोग ?
-सरकारचा आत्ता पर्यंतचा सर्वात यशस्वी Poverty Alleviation Program कोणता ? आजही जितक्या Intensity ने हे कार्यक्रम चालू करतायत आहे, तितक्या Intensity ने राबवण्याची गरज आहे का ?
-MNREGA चा कसा फायदा झाला ? कोणाचा अहवाल होता हा ? शिकणारी मुलं ही काम करतात ?
-(आम्ही ऐकलं होतं शिकलेली मुलं ही काम करत नाहीत.!)
M2 :
-26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जे दहशतवादी आले ते कुठून आले ? कोणत्या संघटनेचे होते ? जे अतिरेकी पकडले त्यांना चिकन बिर्याणी खाऊ घातली पण त्यांच्याकडून कोणतीही माहिती नाही मिळाली ? त्यांना जिवंत ठेवून आपण फुकट खर्च केला !
-तुम्ही ज्या परिसरात DySP आहात तिथे Mob Lynching झाले. बाहेरून आलेल्या व्यक्तीला जमावाने मारले. त्यानंतर तुम्ही काय कराल ?
M1 :
-काय हो, ‘कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे’ असं म्हणतात. पण, खरा सुंदर निसर्ग असूनपण तिथे काहीच विकास नाही, असं का ? त्याची कारणे आणि काय करावे, की विकास होईल.
M2 :
-Sociology तुमचा Optional आहे, जाती-व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यातील संबंध कसा. अशी एक Sociological Theory आहे ?
अध्यक्ष :
-जाती-व्यवस्था आणि वर्णव्यवस्था मुळे समाजाला काही नुकसान होतेय का ?
M2 :
-जाती-व्यवस्था आजही पाळली जाते ?
M1 :
-कशी पण, तुम्ही म्हणता जाती-व्यवस्था पाळली जात नाही ?
अध्यक्ष :
-राजकीय दृष्टीने जातीचा वापर निवडणुकांमध्ये केला जातो, हे चुकीचे की बरोबर ?
M1:
-नाणार प्रकल्प झाला पाहिजे की नाही ? तेथील स्थानिक तर म्हणतात की हा प्रकल्प होऊ नये ! राजकीय विरोध आहे काय होईल ?
अध्यक्ष :
-कधीपर्यंत रद्द झालेले भूसंपादन पूर्ण होईल असं वाटतं ? एक वर्षात कसं होईल ? कसं पटवून द्याल लोकांना ?
M1 :
-म्हणजे हा प्रकल्प झाला पाहिजे का ?
Thank You | ( या तुम्ही )
Wish केलं आणि निघलो.
====================================
Additional Information : (if available)
Marks and Posts Details :
MPSC Rajyaseva Exam 2018
Deputy Superintendent Of Police/Assistant Commissioner Of Police, Group-A
Name | DEVALEKAR SANKET NATHURAM |
Rank | SC-General 1 |
Language Descriptive Paper | 22+32 Marks |
Language Objective Paper | 71 Marks |
General Studies Paper 1 | 87 Marks |
General Studies Paper 2 | 84 Marks |
General Studies Paper 3 | 90 Marks |
General Studies Paper 4 | 71 Marks |
Interview Marks | 37 Marks |
Total Marks/900 | 457 +37 = 494 Marks |