MPSC Combine 2023 Advertisement

Welcome to MPSC Material. In This Post we will discuss all details about mpsc new pattern of Combined 2023 Exams, mpsc time table 2023 of combined 2023, eligibility, syllabus

MPSC Combine Recruitment 2023

MPSC Combined Advertisement 2023
MPSC Combined Advertisement 2023

Maharashtra Public Service Commission is going to conduct MPSC Combined Exam 2023 to recruit the following posts as follows :

(१) सहायक कक्ष अधिकारी (Any Graduate)

(२) राज्य कर निरीक्षक (Any Graduate)

(३) पोलीस उपनिरीक्षक (Any Graduate+Physical)

(४) दुय्यम निबंधक, श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक (Any Graduate)

(५) कर सहायक (Any Graduate+ English 40+ Marathi 30 Typing)

(६) दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (Any Graduate+Physical)

(७) उद्योग निरीक्षक (Engineering/Science Etc)

(८) लिपिक-टंकलेखक (Any Graduate+ English 40 किंवा Marathi 30 Typing)

(९) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय (Any Graduate)


MPSC Combine 2023- Overview

This is the One and Only Combined Prelim Examination For the Above Given Posts

OrganizationMaharashtra Public Service Commission
PostsASO, STI, PSI, SR, ESI, Clerk, Tax Assistant, AMVI etc
Vacancies8169
CategoryNon-Gazetted Maharashtra Government Jobs
Application ModeOnline
Registration Dates25 January 2023 to 14 February 2023
Educational QualificationGraduation/Diploma (Depending on Posts)
Age Limit19-38 Years and Relaxation
Selection ProcessPrelim and Mains and For some additional Typing Tests or Physical and Interview etc
Salary34000-122800/-
Official Websitempsc.gov.in
DownloadMPSC Combine Adv 2023

MPSC Combine 2023- Syllabus

Visit Master Page: MPSC Syllabus

MPSC Combine 2023- Exam Pattern

परीक्षेचे टप्पे-

१. संयुक्त पूर्व परीक्षा- १०० गुण

२. स्वतंत्र मुख्य परीक्षा – ४०० गुण (एकूण २ पेपर)

३. शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उप-निरीक्षक पदाकरीता शारीरिक चाचणी – १०० गुण व मुलाखत – ४० गुण.

४. सहायक मोटार वाहन निरीक्षक गट- क पदाच्या पूर्व परीक्षेकरीता सदर अभ्यासक्रम लागू. मात्र, स्वतंत्र मुख्य परीक्षा – ३०० गुण.

MPSC Combine 2023- Questions Papers

[ALL] MPSC Combined Questions Papers with Answers Keys [ASO-STI-PSI]
[ALL] MPSC ASO Questions Papers with Answers Keys
[ALL] MPSC STI questions paper with answers in pdf
[ALL] MPSC PSI Questions Papers with Answers in Marathi pdf
[ALL] MPSC Group C Combined Questions Papers and Keys 
[ESI-Tax Asst-Clerk Ty-Tech. Asst- II]
[ALL] MPSC Excise sub-inspector previous questions papers with answers keys [PDF]
[ALL] MPSC Tax Assistant question papers with answers keys
[ALL] MPSC Clerk Typist exam questions papers with answers in PDF
[ALL] MPSC Technical Assistant questions papers with keys
[ALL] MPSC Industries Inspector Questions Papers and keys
MPSC AMVI RTO Exam Question Papers PDF Download


MPSC Combine 2023- Important Dates

Applications Dates : Not Yet Given

१. संयुक्त पूर्व परीक्षा- १०० गुण

Date : 30 April 2023

२. स्वतंत्र मुख्य परीक्षा – ४०० गुण (एकूण २ पेपर)

Group B : 02 September 2023

Group C : 09 September 2023

३. शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उप-निरीक्षक पदाकरीता शारीरिक चाचणी – १०० गुण व मुलाखत – ४० गुण.

Date: Will Be Given After Mains Result

४. सहायक मोटार वाहन निरीक्षक गट- क पदाच्या पूर्व परीक्षेकरीता सदर अभ्यासक्रम लागू. मात्र, स्वतंत्र मुख्य परीक्षा – ३०० गुण.

Mains Date: 10 September 2023


MPSC Combine Vacancy 2023

Not Yet Given but Approximately 5000-10000.


MPSC Combine 2023 Online Application

Website: https://mpsconline.gov.in/candidate


MPSC Combine 2023 Application Fee

Application Fees :

Prelim: 394 For Open and 294 For reserved.

Mains: 544 For Open and 344 For reserved.


MPSC Combine 2023 Eligibility Criteria

३.३.१ शैक्षणिक अर्हताः-

३.३.१.१ उद्योग निरीक्षक तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक संवर्ग वगळता इतर सर्व संवर्गाकरीता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा

महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अहंता..

३.३.१.२ उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहोल:-

(१) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी

संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

३.३.१.३ सहायक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरीता अर्हता खालीलप्रमाणे राहील:- (१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी. च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अहंता, आणि

(२) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील किमान ३ वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता.

(३) स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील मान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवार देखील पात्र राहतील. (४) खालील अर्हता समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून स्वीकाराहं आहेत:-

शासन पत्र, गृह विभाग, क्रमांक: एमव्हीडी १२१६/प्र.क्र.- ३०१/ परि ३. दिनांक २३ जानेवारी २०१७

(१) डिप्लोमा इन प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी

(२) डिप्लोमा इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंग

(३) डिप्लोमा इन मशिन टूल्स मेन्टेनन्स

(४) डिप्लोमा इन फैब्रिकेशन टेक्नॉलॉजी

(५) डिप्लोमा इन फैब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग

(६) डिप्लोमा इन प्लॅन्ट इंजिनिअरिंग

(७) डिप्लोमा इन मेटॅलर्जी

(८) बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरींग

(९) बॅचलर डिग्री इन अॅटोमोबाईल इंजिनिअरींग

(१०) बॅचलर डिग्री इन प्रॉडक्शन इंजिनिअरींग

(११) बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रिअल इंजिनिअरोग

(१२) डिप्लोमा इन मेकेट्रॉनिक्स इंजिनिअरिंग

(१३) डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी

(१४) 4 Years of Theoretical and Practical Training as in Artificer Apprentice.

(५) उपरोक्त नमूद पदवी/पदविकांव्यतिरिक्त इतर पदवी/पदविकांच्या समतुल्यतेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यास यथास्थिती केंद्र शासनाचा अथवा राज्य शासनाचा निर्णय अंतिम मानण्यात येईल.

३.३.१.४ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

३.३.१.५ संबंधित शैक्षणिक अर्हतेच्या (पदवी अथवा पदविका) शेवटच्या वर्षांच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.

परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

३.३.१.६ अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.

३.३.२ अनुभव (फक्त सहायक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरीता):-

३.३.२.१ स्वयंचल अभियांत्रिकी वा यंत्र अभियांत्रिकी मधील पदविका / पदवी/ अत्युच्च अहंता अथवा वरीलप्रमाणे समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसायांचे अखत्यारीतील यंत्रशाळांमध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान एक

वर्ष कालावधीचा अनुभव आवश्यक. ३.३.२.२ अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अॅप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहित धरला जाऊ शकेल…

३.३.२.३ मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान एक वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल त्यांनी नियुक्तीनंतर परिविक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये

अथवा शासन वेळोवेळी निदेशित करेल अशा संस्थांमध्ये किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. ३.३.३ वैध अनुज्ञप्ती (License) [फक्त सहायक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरीता ]:-

३.३.३.१ मुख्य परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारी गिअर्स असलेली मोटार सायकल, हलके मोटार वाहन आणि परिवहन वाहन (जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन) या संवर्गासाठी सक्षम प्राधिका-याने दिलेली वैध अनुज्ञाप्ती

(Licence) आवश्यक. ३.३.३.२ अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड माल वाहतूक वाहन किवा जड प्रवासी वाहतूक वाहन यापैकी एखादी किंवा दोन्ही वाहने चालविण्याची अनुज्ञप्ती (Licence) नसेल तर अशा उमेदवारास अशी अनुज्ञप्ती, नियुक्ती नंतरच्या

दोन वर्षांच्या परिवीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक असेल.

३.३.३.३ परिविक्षा कालावधीमध्ये अशी अनुज्ञप्ती प्राप्त न करणा-या उमेदवारास सेवेतून कमी करण्यात येईल.

३.३.३.४ वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती वेळोवेळी नूतनीकरण केली असली पाहिजे आणि

३.३.४ शारीरिक अर्हताः-

३.३.४.१ खालील संवर्गाकरीता विकल्प देणाऱ्या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे:-

अ.क्र.संवर्गपुरुषमहिला
1.पोलीस उपनिरीक्षक(१) उंची १६५ से. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
(२) छाती न फुगविता ७९ से.मी. फुगविण्याची क्षमता किमान ५ से.मी.
उंची १५७ से.मी. (अनवाणी) (कमीत कमी)
2.दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(१) उंची १६५ से. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
(२) छाती न फुगविता ७९ से.मी. फुगविण्याची क्षमता किमान ५ से.मी.
(१) उंची किमान १५५ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)
(२) वजन- किमान ५० कि.ग्रॅ.
3.सहायक मोटार वाहन निरीक्षक(१) उंची १६३ से. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
(२) छाती न फुगविता ७९ से.मी. फुगविण्याची क्षमता किमान ५ से.मी.
(१) उंची किमान १५५ से.मी. (अनवाणी) (कमीत कमी)
(२) वजन किमान ४५ कि.ग्रॅ.
जे रंगांध नसून, ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा शिवाय चांगली आहे.जे रंगांध नसून, ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा शिवाय चांगली आहे.

३.३.४.२ संबंधित संवर्गातील नियुक्तीकरीता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिकान्याकडून तपासून घेण्यात येतील. विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

३.३.५ टंकलेखन अर्हता :-

३.३.५.१ कर सहायक व लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन अहंता असणे आवश्यक आहे:-

कर सहायकलिपिक-टंकलेखक
मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

३.३.५.२ शासन निर्णय. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक एसपीई १०१२/ (१०८/१२)/साशि-१, दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१३ अथवा तदनंतर शासनाने वेळोवेळी आदेश काढून विहित केलेली संगणक टंकलेखन अर्हता- बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी ३० शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट (लागू असेल त्याप्रमाणे) समकक्ष अर्हता म्हणून स्वीकारार्ह आहे.

३.३.५.३ शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे.

३.३.५.४ शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही-२०२३/प्र.क्र. १/कार्यासन- १२. दिनांक १२ जानेवारी, २०२३ नुसार केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणान्या उमेदवाराची लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षात मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. तसेच, केवळ मराठी टंकलेखन धारण करणाऱ्या उमेदवाराची लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षात इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील. अन्यथा संबंधितांची वेतनवाढ रोखण्यात येईल.

३.३.५.५ टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट:-

(१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अपंग-२०१६/प्र.क्र. ११६/१६-अ, दिनांक १६ नोव्हेंबर, २०१६ नुसार दिव्यांग उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाच्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

(२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१८०/२८ दिनांक १३ जून २०१९ अन्वये माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

(३) शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांक: अनाथ-२०२२/प्र.क्र.८४/का-०३, दिनांक ०७ जुलै २०२२ अन्वये अनाथ उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अहंता अनिवार्य नाही.

(४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- १११४/प्र.क्र. २००/१६-अ, दिनांक ४ सप्टेंबर, २०१५ अन्वये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी वर संधी अनुज्ञेय असल्यामुळे प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा दावा करणाच्या उमेदवारांना टंकलेखन अहंता अनिवार्य नाही.

(१) सहायक कक्ष अधिकारी (Any Graduate)

(२) राज्य कर निरीक्षक (Any Graduate)

(३) पोलीस उपनिरीक्षक (Any Graduate+Physical)

(४) दुय्यम निबंधक, श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक (Any Graduate)

(५) कर सहायक (Any Graduate+ English 40+ Marathi 30 Typing)

(६) दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (Any Graduate+Physical)

(७) उद्योग निरीक्षक (Engineering/Science Etc)

(८) लिपिक-टंकलेखक (Any Graduate+ English 40 किंवा Marathi 30 Typing)

(९) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय (Any Graduate)

(१०) सहायक मोटार वाहन निरीक्षक (Mechanical/ Automobile Engineering Diploma/Degree Related+ Physical)


MPSC Combine 2023 Selection Process

६.४ पूर्व परीक्षेचा निकाल :

६.४.१ भरावयाच्या प्रत्येक संवर्गाकरीता तसेच लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या बाबतीत प्रत्येक नियुक्ती प्राधिकारी निहाय स्वतंत्रपणे निकाल जाहीर करण्यात येईल.

६. ४.२ संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करताना उमेदवारांकडून घेतलेल्या विविध संवर्गाच्या विकल्पाच्या आधारे तसेच प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या अराखीव व आरक्षित पदसंख्येच्या आधारे संबंधित प्रत्येक संवर्गाकरीता तसेच लिपिक- टंकलेखक संवर्गाच्या बाबतीत प्रत्येक नियुक्ती प्राधिकारी निहाय भरावयाच्या एकूण पदांच्या सुमारे १२ पट उमेदवार संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील, अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची किमान सीमारेषा (Cut Off Line) निश्चित करण्यात येईल. तद्नंतर, दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक आरक्षित प्रवर्गातील पदांसाठी १२ पट उमेदवार उपलब्ध होतील, अशा रीतीने गुणांची किमान सीमारेषा खाली ओढली जाईल. तथापि, अशा पध्दतीने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेले अतिरिक्त उमेदवार केवळ त्यांच्या आरक्षित पदावरच निवडी/ शिफारशीसाठी पात्र असतील.

६.४.३ अराखीव (खुला) पदांकरीता निश्चित करण्यात आलेल्या गुणांच्या किमान सीमारेषेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी अंतिम निवडीच्या वेळी अराखीव (खुला) पदासाठी विचारात घेतली जाईल. अराखीव (खुला) पदासाठी निश्चित करण्यात आलेली गुणांची किमान सीमारेषा शिथिल करुन मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेले उमेदवार अंतिम शिफारशीच्या वेळी फक्त संबंधित आरक्षित पदावरील निवडीसाठी पात्र ठरतील.

६.४.४ प्रत्येक प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी आयोगाने निश्चित केलेल्या गुणांच्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना त्यांनी संयुक्त पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे, ते विहित अटींची पूर्तता करतात असे समजून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात संबंधित मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

६. ४.५ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल व निकाल जाहीर झाल्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला आयोगाकडील नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे वैयक्तिकरित्या कळविण्यात येईल. तथापि, लघुसंदेशाद्वारे वैयक्तिकरित्या कळविण्याची सुविधा ही अतिरिक्त सुविधा असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला निकाल हाच अधिकृत मानण्यात येईल.

६.४.६ संयुक्त पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टिने घेण्यात येणारी चाळणी परीक्षा असल्याने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी केली जात नाही अथवा यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या अभिवेदनावर कार्यवाही केली जात नाही.


MPSC Combine 2023 Salary

संवर्ग /पदाचे नाववेतन संरचना
(१) सहायक कक्ष अधिकारी S-१४ : रुपये ३८६००- १२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
(२) राज्य कर निरीक्षक S-१४ : रुपये ३८६००- १२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
(३) पोलीस उपनिरीक्षक S-१४ : रुपये ३८६००- १२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
(४) दुय्यम निबंधक, श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक S-१४ : रुपये ३८६००- १२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
(५) कर सहायक S-८ : रुपये २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
(६) दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क S-१२ : रुपये ३२०००- १०१६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
(७) उद्योग निरीक्षकS-१३ : रुपये ३५४००- ११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
(८) लिपिक-टंकलेखक S-६ : रुपये १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
(९) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय S-१० : रुपये २९२०० – ९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
(१०) सहायक मोटार वाहन निरीक्षक S-१४ : रुपये ३८६००- १२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते


MPSC Combine 2023 Admit Card

Admit card Will BeAvaliale before 7 days before the exam on https://mpsconline.gov.in/candidate


MPSC Combine 2023 Result

Prelim Results will Be available After 3 Months Of the Exam

Leave a Reply